भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO Recruitment 2023) मध्ये 2859 जागांसाठी भरती करण्यासाठी यूपीएससी तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये 2859 जागांसाठी भरती (EPFO Recruitment 2023)
एकूण पदसंख्या – 2859 पदे
उपलब्ध पदे आणि संख्या
- सामाजिक सुरक्षा सहाय्यक 2674 पदे
- लघु लेखक – 185 पदे
सामाजिक सुरक्षा सहाय्यक पात्रता निकष
वय | ऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 27 वर्षे (वयोगटातील सूट लागू, एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्षे) |
शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण |
एकूण रिक्त जागा | 2674 पदे |
टायपिंगचा वेग | इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट |
मिळणारे वेतन (पगार) | दरमहा रुपये – 29,200/– ते 92,300 अधिक भत्ते |
अर्ज शुल्क | PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही एससी आणि एसटी अर्ज शुल्क नाही ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 700 रुपये |
लघु लेखक पात्रता निकष
वय | ऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 27 वर्षे (वयोगटातील सूट लागू, एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्षे) |
शैक्षणिक पात्रता | अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
एकूण रिक्त जागा | 185 पदे |
स्टेनोग्राफी मध्ये कौशल्य चाचणी | Dictation : 80 शब्द प्रति मिनिट या दराने दहा मिनिटे. (Dictation संगणक आधारित असेल) Transcription : 50 मिनिटे (इंग्रजी) / 65 मिनिटे (हिंदी). (फक्त संगणकावर) |
मिळणारे वेतन (पगार) | दरमहा रुपये – 25,500/– ते 81,100 अधिक भत्ते |
अर्ज शुल्क | PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही एससी आणि एसटी अर्ज शुल्क नाही ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 700 रुपये |
अर्ज असा करा
अर्जाविषयी अतिरिक्त सूचना आणि माहिती तसेच जाहिरात बघण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या वेबसाईटला भेट द्या.
EPFO Website – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
UPSC Website – https://www.upsc.gov.in/apply-online