Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

होळी सणाची माहिती आणि महत्व

हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावर सण साजरे केले जातात. आपणा सर्वांकडून साजरा केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाला काही ना काही धार्मिक महत्त्व तसेच शास्त्रीय महत्त्व देखील असते. होळीचा सण हा त्यापैकीच एक आहे. मराठी महिन्यांमधील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला मराठी महिन्यांमधील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. होळीला रंगांचा सण, रंगपंचमी किंवा धुलीवंदन ही म्हणतात. भारतामध्ये विविध ठिकाणी होळी हा सण साजरा करण्याची परंपरा आणि पद्धती वेगळी आहे. वेगवेगळ्या राज्यातील होळीची पद्धत तितकीच आकर्षक आणि खास असते. महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगाही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वासोंतोत्सवाला सुरुवात होते. होळीच्या दिवशी होळी दहन करून दुसऱ्या दिवशी रंगांचा उत्सव एकमेकांवर रंग उडवून साजरा केला जातो. होळीच्या दिवसांमध्ये गव्हाचे पीक तयार होते त्यामुळे होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या आणि नारळ भाजण्याची प्रथा आहे. तसेच हे नवीन येणारे पीक होळीतील अग्नीदेवतेला समर्पित केले जाते. चला तर मग जाणून घेऊयात होळी सणाची माहिती आणि महत्त्व काय आहे ते.

Table of Contents

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
Toggle

होळी सणाचे महत्व

होळीच्या सणामागील मुख्य आणि मानसिक उद्देश म्हणजे दृष्ट आणि वाईट प्रवृत्ती, वाईट विचार यांचा होळीच्या अग्नीमध्ये दहन करून चांगले विचार आणि चांगले वृत्ती अंगी बाळगावी अशी होळी समोर प्रार्थना केली जाते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा आपल्यातील वाईट प्रवृत्तींना बाहेर काढण्याचाच एक भाग मानला जातो. होळीचा सण हिवाळा संपल्याची आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देतो.

होळी सणाची माहिती

आपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे प्राचीन इतिहास आणि काही ना काही कहाणी असते तशीच कहाणी होळीचा सण साजरा करण्यामागे आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे हिरण्यकश्यपू पूर राजाची कहाणी आहे. पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यपू पण नावाचा खूप बलवान राजा होता. या राजाला स्वतःचा खूप अहंकार होता आणि या अहंकारामुळेच तो देव देवतांची घृणा करायचा तसेच त्याला भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील आवडायचे नाही. परंतु हिरण्यकश्यपू राजाचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूची उपासना करायचा. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हादाची विष्णू भक्ती हिरण्यकश्यपू राजाला पसंत नव्हती. हिरण्यकश्यपूराजा प्रल्हादला भगवान विष्णूची उपासना सोडण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी घाबरवत असे. भक्त प्रल्हाद या गोष्टींना न डगमगता भगवान विष्णू वरील भक्तीत रममाण होत असे. हिरण्यकश्यपू राजाने एका योजनेनुसार आपली बहीण होलीका हिला भक्त प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. होलिकाला वरदान मिळाले होते की कोणताही अग्नी तिला जाळू शकत नाही आणि ती अग्नीवर विजय मिळवू शकते. भक्त प्रल्हाद आपली आत्या म्हणजे होलिका सोबत अग्नीच्या चितेवर बसला आणि भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला. अग्नीच्या चितेवर बसल्यानंतर होली का जळायला लागली. त्याबरोबर एक आकाशवाणी झाली की होलिका जर तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तर ती स्वतः त्या अग्नीमध्ये जळून राख होईल. होलिका त्या अग्नीमध्ये जळाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. अशाप्रकारे वाईट गोष्टींचा होळीच्या अग्नीमध्ये त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी लोकांनी होळी हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा उत्सव म्हणजेच धुलीवंदन किंवा रंगपंचमी साजरा केला जातो.

होळीच्या शुभेच्छा मराठी संदेश

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या शुभेच्छा मराठी बॅनर

Exit mobile version