Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

बुडणाऱ्या महिलेचे रोहनने वाचविले प्राण. बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित

अवघ्या १५ वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये बुडणाऱ्या ४३ वर्षे  वयाच्या महिलेचे प्राण वाचविले आहे. त्याच्या या अतुलनीय साहस आणि धाडसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहनचा बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरव करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी ११ बालकांना बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सन्मान सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक बालकाशी संवाद साधला आणि त्याच्यासोबत फोटो काढला. पंतप्रधान मोदी रोहनचे कौतुक करत म्हणाले की “नदीत उडी मारून एका महिलेला बुडण्यापासून वाचवणाऱ्या रोहन रामचंद्र बहीरचा मला अभिमान आहे. त्याने प्रचंड शौर्य आणि निर्भयपणा दाखवला. प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा”.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

काय आहे रोहनच्या शौर्याची कहाणी?

महाराष्ट्राच्या अवघ्या १५ वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिरने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राजौरीच्या डोंमरी नदीत बुडणाऱ्या ४३ वर्षे वयाच्या महिलेला नदीमध्ये उडी घेऊन तिचे प्राण वाचविले. त्याच्या या प्रचंड शौर्य आणि निर्भयपणाची केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने दखल घेत त्याची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड केली आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रोहनच्या शौर्याची कहाणी ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Exit mobile version