मुंबईत रविवारी मध्य रेल्वे (Central Line), हार्बर रेल्वे (Harbor Line), पश्चिम रेल्वे (Western Line) मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप तसेच डाउन दिशेकडील लोकल सेवा ह्या रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे चालविण्यात येणार आहे. मुंबई लोकल मेगा ब्लॉक 9 एप्रिल 2023 (Mumbai Local Mega Block Today 9 April 2023) या दिवशी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मुंबई लोकल मेगा ब्लॉक 9 एप्रिल 2023 (Mumbai Local Mega Block Today 9 April 2023) TIME TABLE
आज दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी मध्य रेल्वे (Central Line), हार्बर रेल्वे (Harbour Line), पश्चिम रेल्वे (Western Line) मार्गावर अप तसेच डाउन दिशेकडील लोकल सेवा ह्या रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
सेंट्रल लाईन मेगाब्लॉक (Central Line Mega Block)
आज दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी मध्य रेल्वे (Central Line) मेन लाईन वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण स्थानकादरमान्य रविवारी दिवसा कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही.
हार्बर लाईन मेगाब्लॉक (Harbour Line Mega Block)
आज दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी हार्बर रेल्वे (Harbor Line) मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकादरमान्य अप तसेच डाउन दिशेकडील मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप आणि डाउन दिशेकडील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
वेस्टर्न लाईन मेगाब्लॉक (Western Line Mega Block)
आज दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी पश्चिम रेल्वे (Western Line) मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरमान्य अप तसेच डाउन दिशेकडील मार्गावर सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत अप तसेच डाउन दिशेकडील जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल फेऱ्या गोरेगाव स्तनाकापर्यंत चालवण्यात येतील.
आज दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी रेल्वे पुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक घेण्यात येईल
मध्य रेल्वेच्या कोपर ते ठाकुर्ली स्थानकादरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर साठी रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या गर्डर उभारणीसाठी आज शनिवारी 8 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे.