Job Alert : IOCL Recruitment 2023 l इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 490 जागांसाठी नोकरीची संधी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक उपक्रमांपैकी एक आणि फॉर्च्युन “ग्लोबल 500” कंपनी आहे. या कंपनी मधे तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटिस आणि अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह/ग्रॅज्युएट अप्रेंटिस (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शिकाऊ उमेदवारांच्या भर्ती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी निवडलेले उमेदवार हे कंपनीच्या तामिळनाडू, पॉंडिचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कार्यरत असतील. उमेदवारांची निवड ऑनलाइन (Objective Type) परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षेसाठी पात्रता, परीक्षेचे स्वरूप, राज्यनिहाय उपलब्ध जागा याचा तपशील खाली दिलेला आहे.


Indial-Oil-Corporation-Recruitment-2023
Indial-Oil-Corporation-Recruitment-2023

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 490 जागांसाठी नोकरीची संधी

उमेदवार पात्रता निकष (31.08.2023 रोजी):-

  • ट्रेड अप्रेंटिस 150 पद
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस 110 पद
  • ग्रेजुएट अप्रेंटिस/अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह 230 पद
वय 18 ते 24 वर्षे
शैक्षणिक पात्रता

10वी/डिप्लोमा/ITI/BBA/B.A/B.Com/B.Scउत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (ही पात्रता संबंधित पदांनुसार देण्यात आली आहे)

शारीरिक आणि वैद्यकीय फिटनेस उमेदवार हा कंपनीच्या नियमानुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असावा
अर्ज करण्याची पद्धत उमेदवाराने www.iocl.com पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
 एकूण रिक्त जागा  490
अर्ज करण्याची

शेवटची तारीख

10 सप्टेंबर 2023 @ 11:55 p.m.
अर्ज शुल्क PWBD उमेदवारांसाठी 400 रुपये एससी आणि एसटी 600 रुपये ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 800 रुपये

पगार (Stipend) किती मिळणार?

शिकाऊ उमेदवारांना दरमहा देय असलेल्या स्टायपेंडचा दर शिकाऊ कायदा, 1961/1973, शिकाऊ नियमांनुसार विहित केला जाईल.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

अर्ज असा करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज करण्याआधी उमेदवाराने www.iocl.com पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.

उमेदवाराला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईट वरती www.iocl.com अर्ज करावयाचा आहे. कॉर्पोरेशनच्या वेबसाईटच्या होम पेज वरती रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये अप्रेंटीशीप पदाकरिता 2023-24 ची जाहिरात आपल्याला दिसेल. त्या जाहिरातीत Click Here To Apply वरती क्लिक करून आपल्याला अर्ज व्यवस्थित पूर्ण भरायचा आहे. पुढील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

पात्र उमेदवारांची निवड कशी केली जाणार

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन (Objective Type) परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. ही लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची (Objective Type) असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 @ 11:55 p.m. आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी अर्ज करणे अपेक्षित आहे.

कृपया इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा.

Leave a Comment

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join