Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चा खान्दश कन्या पुरस्काराने आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर गौतमी पाटीलने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर भावनिक पोस्ट शेअर करत आमदार जयकुमार रावल यांचे आभार मानले आहे. रावल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गौतमीचा खान्देश कन्या म्हणून गौरव करण्यात आला आहे.

गौतमी पाटील खान्देश कन्या पुरस्काराने सन्मानित

आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये गौतमी म्हणाली की “आपली माजी मंत्री तथा आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश!

खान्देश कन्या गौतमी पाटील ही मुळची धुळे जिल्ह्यातील

गौतमी पाटीलचे मुळ गाव हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात आहे. त्यामुळे तिला खान्देश कन्या या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
Exit mobile version