Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

e-RUPI व्हाउचर काय आहे? e-RUPI व्हाउचर बद्दल संपूर्ण माहिती

E-Rupi व्हाउचर काय आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या 8 जून 2023 रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल केला नाही. या बैठकीमध्ये गव्हर्नर साहेबांनी जाहीर केले की बिगर बँकांनाही e-रुपी व्हाउचरची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात येत आहे.

Table of Contents

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
Toggle

E-Rupi व्हाउचर काय आहे?

e-RUPI हे एक डिजिटल व्हाउचर असून ते ऑगस्ट 2021 ला लाँच करण्यात आले आहे. हे व्हाउचर NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या UPI म्हणजेच युनीफाइड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर चालते. हे व्हाउचर सध्या मर्यादित प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीने बँकांद्वारे जरी केले जाते. ही पेमेंट प्रणाली पूर्णपणे कॅशलेस असल्याकारणाने सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात कोणत्याही मध्यस्ती विना जमा केले जाते. एक क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर पैसे लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जमा होतात.

E-Rupi व्हाउचर कसे काम करते?

E-Rupi व्हाउचर वापरणे अगदी सोपे आहे. हे एका प्रीपेड कार्ड किंवा व्हाउचर सारखे काम करते. IMPS किंवा नेट बँकिंग द्वारे क्यू आर कोड स्कॅन करून पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पाठविले जाऊ शकतात. या प्रणालीद्वारे पेमेंट ची प्रोसेस जलद व त्रुटी विरहित होण्यास मदत होईल.

E-Rupi चा काय फायदा आहे?

सध्या ही सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक इत्यादी बँकांद्वरे दिली जात आहे. आता आरबीआय द्वारे ही सुविधा बिगर बँकिंग कंपन्यांना देण्यात आली आहे.

विशेष करून ही सुविधा अश्या लोकांसाठी जास्त फायद्याची आहे जे मनी ट्रान्स्फर साठी सुविधा वापरात नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या लाभार्थीला सरकारकडून पैसे येणार असतील तर तो या क्यू आर कोड द्वारे मागवू शकतो आणि आपले भुगतान करू शकतो.

 

e-RUPI व्हाउचर काय आहे?

e-RUPI हे एक डिजिटल व्हाउचर असून ते ऑगस्ट 2021 ला लाँच करण्यात आले आहे. हे व्हाउचर NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या UPI म्हणजेच युनीफाइड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर चालते.

E-Rupi व्हाउचर कसे काम करते?

हे एका प्रीपेड कार्ड किंवा व्हाउचर सारखे काम करते. IMPS किंवा नेट बँकिंग द्वारे क्यू आर कोड स्कॅन करून पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पाठविले जाऊ शकतात.

E-Rupi चा काय फायदा आहे?

ही सुविधा अश्या लोकांसाठी जास्त फायद्याची आहे जे मनी ट्रान्स्फर साठी सुविधा वापरात नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या लाभार्थीला सरकारकडून पैसे येणार असतील तर तो या क्यू आर कोड द्वारे मागवू शकतो आणि आपले भुगतान करू शकतो. या प्रणालीद्वारे पेमेंट ची प्रोसेस जलद व त्रुटी विरहित होण्यास मदत होईल.

Exit mobile version