Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

Job Alert : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ५००० जागांसाठी मेगा भर्ती, जाणून घ्या शेवटची तारीख, अर्ज कसा करायचा

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँकांपैकी एक असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ५००० Apprentice पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी निवडलेले उमेदवार हे बँकेच्या संबंधित जिल्ह्यातील शाखा किंवा कार्यालयांमध्ये कार्यरत असतील. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी (Objective Type) परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षेसाठी पात्रता, परीक्षेचे स्वरूप, राज्यनिहाय उपलब्ध जागा याचा तपशील खाली दिलेला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ५००० जागांसाठी मेगा भर्ती

उमेदवार पात्रता निकष (31.03.2023 रोजी):-

 

वय 20 ते 28 वर्षे
(वय मर्यादा सवलत एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्षे, PWBD 10 वर्षे)
शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
शारीरिक आणि वैद्यकीय फिटनेस उमेदवार हा बँकेच्या नियमानुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असावा
उमेदवाराची नोंदणी

उमेदवाराने अप्रेंटीशीप पोर्टलवर स्वतःची  नोंदणी करणे आवश्यक आहे
पोर्टल – www.apprenticeshipindia.gov.in

पोर्टलवर 100% नोंदणी केलेले उमेदवारच बँकेच्या Apprenticeship पदाच्या अर्जासाठी पात्र असतील

 एकूण रिक्त जागा  5000 (अंदाजीत)
कॅटेगरी नुसार रिक्त पदे सर्वसाधारण प्रवर्ग 2159
ओबीसी 1162
एससी 763
एसटी 416
इडब्ल्यूएस 500
अर्ज शुल्क PWBD उमेदवारांसाठी 400 रुपये
एससी आणि एसटी 600 रुपये
ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 800 रुपये
   

पगार (Stipend) किती मिळणार?

अर्ज असा करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज करण्याआधी तुम्हाला सरकारच्या अप्रेंटीशीप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अप्रेंटीशीप पोर्टलवर 100% नोंदणी केलेल्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज करता येईल. पोर्टल- www.apprenticeshipindia.gov.in

अप्रेंटीशीप पोर्टल व नोंदणी केल्यानंतर उमेदवाराला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती www.centralbankofindia.co.in अर्ज करावयाचा आहे. बँकेच्या वेबसाईटच्या होम पेज वरती रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये अप्रेंटीशीप पदाकरिता 2023-24 ची जाहिरात आपल्याला दिसेल. त्या जाहिरातीत Click Here To Apply वरती क्लिक करून आपल्याला अर्ज व्यवस्थित पूर्ण भरायचा आहे. पुढील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

पात्र उमेदवारांची निवड कशी केली जाणार

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची (Objective Type) असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटीशीप पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी अर्ज करणे अपेक्षित आहे.

कृपया सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा.

Exit mobile version