बीडच्या अविनाश साबळे ने ऐतिहासिक कामगिरी करत चीनमध्ये सुवर्णपदक पटकावल

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बीडच्या अविनाश साबळे ने ऐतिहासिक कामगिरी करत चीनमध्ये सुवर्णपदक पटकावल आहे. अविनाशने ३००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे.

beed avinash sable gold medal
अविनाश साबळे

बीडच्या अविनाश साबळे ने ऐतिहासिक कामगिरी करत चीनमध्ये सुवर्णपदक पटकावल

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ (Asian Games 2023) चीन मध्ये हांगझोऊ शहरामध्ये सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या अविनाश साबळे या सुपुत्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. ३००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अविनाश साबळेच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारताच्या सुवर्णपदकामध्ये आणखी एक भर पडली आहे.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

अविनाश मागील महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप ३००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेमध्ये ७ व्या क्रमांकावर आला होता. अविनाश आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उतरला होता. ही स्पर्धा ह्या हंगामातील अखेरची स्पर्धा असल्यामुळे त्याने कसून सराव केला होता. आज त्याने आपले सुवर्णपदकाचे स्वप्नं पूर्ण केले आहे. अविनाश हा ५००० मीटर क्रीडा प्रकारात देखील प्रयत्न करणार आहे.

अविनाश साबळे गाव, शिक्षण, नोकरी

अविनाश साबळे हा मूळचा महाराष्ट्रातील बीडचा राहणारा आहे. वयाच्या अवघ्या ६ वर्षांपासून त्याने धावण्याचा सराव सुरू केला होता. अविनाशचे शिक्षण बारावी पर्यंत झाले असून तो भारतीय लष्कराच्या ५ महर रेजिमेंट मध्ये दाखल झाला होता.

हाच तो सुवर्णक्षण

अविनाश साबळे यांचा जीवन परिचय

अविनाश साबळे यांचे पूर्ण नाव अविनाश मुकुंद साबळे असून त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९९४ रोजी बीड जिल्ह्यातील मांडवा या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून घर ते शाळा हे सहा किलोमीटर अंतर ते चालून आणि धावून पार करत असत. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर अविनाश यांनी भारतीय लष्करामध्ये ५ महार रेजिमेंट जॉईन केले. अविनाश यांनी सियाचीन ग्लेशियर, उत्तर पश्चिम वाळवंट (राजस्थान), सिक्कीम अशा ठिकाणी आपली देशसेवा बजावली आहे. सन २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा क्रॉस कंट्री रनिंग मध्ये भाग घेतला. स्टीपलचेस स्पर्धेच्या सराव कॅम्प मध्ये रुजू होण्याआधी त्यांनी आपले वजन तीन महिन्यांमध्ये  तब्बल वीस किलो कमी केले. अविनाश हे भारतीय ट्रॅक आणि फिल्ड ऍथलिट असून 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये माहिर आहेत.

अविनाश साबळे यांचे करिअर

सन २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या नॅशनल ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अविनाश यांनी गोपाल सैनी यांच्या नावे असलेला 37 वर्ष जुना नॅशनल रेकॉर्ड मोडला. गोपाल सैनी यांचा रेकॉर्ड ८:३०.८८ अविनाश साबळे यांनी ८:२९.८० अशा फरकाने मोडला. सन २०१९ मध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप मध्ये त्यांनी नवीन नॅशनल रेकॉर्ड ८:२८.९४  प्रस्थापित केला. हा रेकॉर्ड मोडीत काढल्यामुळे ते २०१९ च्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि २०१९ च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांसाठी पात्र ठरले. ते दिना राम (१९९१) नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्टीपलचेस स्पर्धेसाठी पात्र ठरणार पहिले पुरुष होते.

२०१९ एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, दोहा सिल्वर मेडल.

२०२२ कॉमनवेल्थ गेम्स सिल्वर मेडल

२०२३ एशियन गेम्स रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्ड मेडल

अविनाश साबळे यांनी एशियन गेम्स मधील इराणच्या हुसेन केयांनी यांच्या नावे असलेला ८:२२.७९ हा रेकॉर्ड मोडून ८:१९.५० हा नवीन रेकॉर्ड आपल्या नावे नोंद केला.

 

 

Leave a Comment

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join