आज 12 जुन 2023 रोजी महाराष्ट्र CET (MHT CET 2023 Result) चा निकाल जाहीर होणार आहे. परीक्षेचा निकाल आज सकाळी ११ वाजता लागणार आहे. Cetcell तर्फे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित तसेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या ग्रुप्ससाठी हा निकाल जाहीर होईल. एमएचटी सीईटी 2023 परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी 9 ते 14 मे 2023 आणि पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे 2023 दरम्यान घेण्यात आली होती. या वर्षी सुमारे 4.6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली होती.
MHT CET Result 2023 Website
- परीक्षेचा निकाल बघण्यासाठी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- या वेबसाइटच्या जाऊन होम पेजवर portal links वर क्लिक करा.
- यानंतर Check MHT CET Result 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
- नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा.
- आपण निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढू शकता.