भारतातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला पॅन कार्ड काढता येऊ शकते. तुम्हाला जर पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्हीही ऑनलाइन पॅन कार्ड बनवू शकता आणि 7 दिवसात घरपोच मिळवू शकता. पॅन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आणि सोपी पद्धत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन पॅन कार्ड काढण्याची सोपी पद्धत.
असे बनवा ऑनलाइन पॅन कार्ड (PAN Card Online Application)
तुम्ही जर PAN Card Apply करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्ही कुठेही न जाता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सात दिवसात पॅन कार्ड घरपोच मागवू शकता.
1) NSDL च्या अधिकृत वेबसाइट वरती जा
खालील फोटोमध्ये दाखविलेल्या प्रमाणे NSDL च्या अधिकृत वेबसाइट वरती जा आणि Online PAN Application वरती क्लिक करा.
2) Online PAN Application फॉर्म
Online PAN Application हा फॉर्म ओपन झाल्यानंतर या फॉर्म मध्ये आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. फॉर्म भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट च्या ऑपशन वरती क्लिक करा. या फॉर्म सोबत तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे पण जोडावे लागतील. एका व्यक्तीला फक्त एकच पॅन कार्ड काढता येवू शकते. जर आपल्याकडे आधीचे पॅन कार्ड असेल तर आपण पुन्हा अर्ज करू शकत नाही.
3) PAN Card Application फी
भारतीय नागरिकांसाठी Online PAN Card Apply करण्यासाठी जवळपास १०५ रुपये फी भरावी लागेल (९३ रुपये शुल्क अधिक १८ टक्के GST).
विदेशी नागरिकांना हि फी जवळपास १०२० रुपये भरावी लागेल (GST सह).
पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे कोणती?
पॅन कार्ड साठी पुढील कागदपत्रे लागतात – आधार कार्ड, ड्रायविंग लायसंस, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शिधापत्रिका, वीज बिल
पॅन कार्ड किती दिवसात मिळते?
साधारणपणे पॅन कार्ड मिळायला 15 ते 20 दिवस लागतात, पण तुम्हाला ते सात दिवसाच्या आत पण मिळू शकेल. आयकर विभागाकडून तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर पॅन कार्ड प्राप्त होईल, हे पॅन कार्ड तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकता.
पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे?
सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. यानंतर डाउनलोड ई-पॅन कार्डच्या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा OTP टाकून तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. OTP टाकल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.26 रुपये शुल्क द्यावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड pdf फाइल म्हणून डाउनलोड करू शकता. तुम्ही या pdf ची कलर प्रिंट काढून लॅमिनेशन देखील करू शकता आणि आवश्यकता असेल तिथे वापरू शकता.