Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

अमरावती मध्ये बनणार मेगा टेक्सटाइल पार्क l Amravati Mega Textile Park

पीएम मित्रा योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे घोषणा करत सांगितले आहे की अमरावतीमध्ये बनणार मेगा टेक्सटाइल पार्क (Amravati Mega Textile Park). महाराष्ट्रातील अमरावती सह देशातील सात राज्यांमध्ये हे मेगा टेक्सटाइल पार्क उभे करण्यात येणार आहेत. या सर्व टेक्सटाइल पार्क साठी प्रत्येकी १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

अमरावती मध्ये बनणार मेगा टेक्सटाइल पार्क

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मूल्यवर्धनासाठी या टेक्स्टाइल मेगा पार्कचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पंतप्रधान मित्रा योजनेचा भाग म्हणून या सर्व टेक्सटाइल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे.

टेक्सटाइल पार्क बनणारे सात राज्य आणि शहरे

या प्रकल्पांच्या माध्यमातून एक लाख प्रत्यक्ष तर दोन लाख अप्रत्यक्ष असे तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. येथे तयार होणारे कापड आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की या पार्कमुळे विखुरलेल्या कापड उद्योगाला मजबुती मिळेल तसेच उच्च मूल्याची वस्त्रे निर्धारित वेळेमध्ये तयार करून निर्यात करायला फायदा होईल.

भारताला सर्वात मोठा निर्यातदार बनवण्याचे लक्ष

भारत हा टेक्स्टाइल मध्ये निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक प्रमुख देश आहे. सन 2030 पर्यंत शंभर अब्ज डॉलरचे वस्त्र निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सन 2047 पर्यंत भारताला सर्वात मोठा वस्त्र निर्यात करणारा देश बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

5 एफ योजना साकार करणार

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की 5 एफ योजना साकार करणार आहे.

5 एफ  योजना म्हणजे फार्म – टू फायबर – टू फॅक्टरी – टू फॅशन – टू फॉरेन

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधत कापसाचे मूल्यवर्धन होणार आहे

महाराष्ट्रातील अमरावती मध्ये मेगा टेक्सटाइल पार्क आल्यानंतर पश्चिम विदर्भाच्या तसेच त्याला लागून असलेल्या विभागांच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल. महाराष्ट्रात सुमारे 43 लाख हेक्‍टरवर कापूस लागवड होते. एकट्या विदर्भात त्यापैकी 18 लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. टेक्सटाइल पार्कच्या उभारणीनंतर या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधत कापसाचे मूल्यवर्धन होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे चांगला फायदा होऊ शकतो.

पीएम मित्र योजना कधी सुरु झाली?

केंद्र सरकार द्वारा पीएम मित्र योजना ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री मेगा टेक्सटाइल इंटीग्रेटेड टैक्सटाइल एंड अपैरल योजना म्हणूनही ओळखली जाते.

पीएम मित्र योजना कोणते केंद्रीय मंत्रालय लागू करते?

पीएम मित्र योजना केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाकडून लागू करण्यात आली आहे.

भारतामध्ये किती पीएम मित्र योजना मेगा टेक्सटाईल पार्क आहेत?

भारतामध्ये ७ पीएम मित्र योजना मेगा टेक्सटाईल पार्क (Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) Parks) आहेत.

मेगा टेक्सटाईल पार्क कोणते राज्य आणि शहरांमध्ये बनणार आहे?

महाराष्ट्र – अमरावती
मध्यप्रदेश – धार
गुजरात – नवसारी
कर्नाटक – कलबुर्गी
उत्तर प्रदेश – लखनऊ
तामिळनाडू – तिरुधूनगर
तेलंगणा – वारंगल

Exit mobile version