राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी २३ जानेवारीला ११ बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले आहे. याप्रसंगी बोलतांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या कि बालके हि आपल्या देशाची अमूल्य संपत्ती आहे. त्यांच्या भविष्यासाठी केला गेलेला प्रत्येक प्रयत्न आपल्या समाजाच्या आणि देशाच्या भविष्याला आकार देईल.
यावर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कार सहा मुलांना आणि पाच मुलींना देण्यात आला. यावर्षी कला आणि संस्कृती क्षेत्रामध्ये ४, शौर्य मध्ये १, नाविन्यामध्ये २, सामाजिक कार्यात १ आणि खेळामध्ये ३ मुलांना हा पुरस्कार त्यांच्या नावीन्यपूर्ण कामगिरीबद्दल देण्यात आला.
चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या मुलांना दिला जातो आणि याची सुरुवात कधी झाली.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार काय आहे?
भारताच्या केंद्र सरकारने सन १९९६ मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार ची सुरुवात केली. महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्या मुलांना सन्मानित करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बाल पुरस्काराची सुरुवात केली गेली. या पुरस्काराने सन्मानित झालेली मुले गणतंत्र दिवस परेडमध्ये भाग घेतात.
कोणत्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो?
प्रत्येक वर्षी केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री बाल पुरस्कारासाठी मुलांची निवड केली जाते. हा पुरस्कार सहा श्रेणीमध्ये दिला जातो त्या पुढील प्रमाणे आहेत शैक्षणिक, कला आणि संस्कृती, शौर्य, नाविन्य, सामाज सेवा आणि खेळ. 2018 सालापासून शौर्य क्षेत्रामध्ये चमक दाखविलेल्या मुलांना या पुरस्कारामध्ये सामील करण्यात आले आहे.
कोणत्या मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली जाते?
राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्यावतीने बाल पुरस्कारार्थींची निवड केली जाते. ज्या मुलांचे वय ५ वर्षापेक्षा जास्त आणि १८ वर्षापेक्षा कमी आहे आणि जो भारताचा नागरिक असून भारतात राहतो अशांना हा पुरस्कार दिला जातो.
राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना काय मिळते?
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार च्या विजेत्यांना एक पदक, एक प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये रोख दिले जाते.
राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३ विजेत्यांची नावे
पुरस्कार विजेता नाव | वय | श्रेणी | राज्य |
अनुष्क जौली | १४ | सामाज सेवा | दिल्ली |
आदित्य सुरेश | १६ | कला आणि संस्कृती | केरळ |
एम. गौरवी रेड्डी | १७ | कला आणि संस्कृती | तेलंगणा |
संभव मिश्रा | १६ | कला आणि संस्कृती | ओडिशा |
श्रेया भट्टाचार्य | १२ | कला आणि संस्कृती | आसाम |
रोहन रामचंद्र बहीर | १५ | शौर्य | महाराष्ट्र |
आदित्य प्रताप सिंह चौहान | १७ | नाविन्य | छत्तीसगड |
ऋषि शिव प्रसन्ना | ८ | नाविन्य | कर्नाटक |
शौर्यजीत रंजीतकुमार खैरे | १० | खेळ | गुजरात |
केए मीनाक्षी | ११ | खेळ | आंध्र प्रदेश |
हनाया निसार | १६ | खेळ | जम्मू-काश्मीर |